पिंपरी – फिरत्या शौचालय आणि त्याची ट्रॉली चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 4 डिसेंबर रोजी सकाळी निगडी येथील चिकन चौकात उघडकीस आली.
महेश नानासाहेब आढाव (वय 42, रा. आनंदनगर, जुनी सांगवी) यांनी याबाबत सोमवारी (दि. 7) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाकडून शहरात विविध ठिकाणी फिरते शौचालय ठेवण्यात आले आहे. निगडी येथील चिकन चौकाजवळ देखील एक फिरते शौचालय ट्रॉली (एमएच-14-एझेड-9895) ठेवण्यात आली आहे.
3 डिसेंबर रोजी दुपारी सव्वातीन ते 4 डिसेंबर सकाळी सात या कालावधीत चोरट्यांनी 95 हजार रुपये किमतीचे शौचालय आणि ट्रॉली चोरून नेली.