रांजणगाव गणपती (वार्ताहर) : रांजणगाव औद्योगिक वसाहती मधील व्हर्लफुल कंपनीच्या गोडाऊन मधून चोरी केलेला माल हस्तगत करण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना यश आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली. सदर आरोपींना ताब्यात घेऊन रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल ३७ लाख १४ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
रांजणगाव औद्योगिक वसाहती मधील इंडोस्पेस
लॉजिस्टिक पार्क मधील व्हर्लफुल कंपनीच्या गोडाऊन मध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने जुलै २०२४ ते १२ ऑगस्ट २०२४ दरम्यान गोडाऊन मधून मायक्रो ओवन, एसी, फ्रिज, डिश वॉशर, वॉशर, असे एकूण किंमत २२ लाख ८८ हजार २६ हे चोरी करून चोरून नेले होते. माल चोरीस गेल्याबाबत कंपनीचे मॅनेजर संदीप नारायण पवार राहणार शिरूर ग्रीन सिटी, गोले गाव रोड, तालुका शिरूर, जिल्हा पुणे यांनी फिर्याद दिली होती.
या फिर्यादीची दखल घेत पोलीस पथकाने तपास केला असता १) बाळू रघुनाथ गायकवाड, रा दरोडी ता पारनेर जि नगर २) मयूर विलास सरोदे, रा सरदवाडी ता शिरुर जि पुणे ३) संभाजी शिवाजी भोसले, रा दरोडी ता पारनेर जि नगर ४) जावेद उर्फ गौसे अजम नजिर शेख, रा हुडको शिरूर ता शिरुर जि पुणे ५) रमेश रामभाऊ स्वराडे स कामाठीपुरा ता शिरुर जि पुणे यांना अटक करण्यात आली.
सदर आरोपी यांच्याकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देउन त्यांचे आणखीन साथीदार नावे ६) मुज्जफर रमजान शेख वय २९ वर्ष रा दरोडी ता पारनेर जिल्हा अहमदनगर ७) सलीम मुनीर शेख वय २८ वर्ष रा दरोडी ता पारनेर जिल्हा अहमदनगर ८) दिपक रामदास मस्कुले वय ३२ वर्ष य दरोडी ता पारनेर जिल्हा अहमदनगर यांना अटक करण्यात पोलीसांना यश आले असुन सदर सर्व आरोपी यांच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणा वरुन खालील प्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
त्यामध्ये वर्ल फुल कंपनीचे 1) एसी, 2)19 डबल डोअर रेफ्रिजरेटर, 3) 16 वॉशिंग मशिन, 4) 18 डिश वॉशर, 5) 85 मायक्रो ओवन 6) 09 सिंगल डोअर रेफ्रिजरेटर 7) 06 ईलेक्ट्रिक शेगडी असा एकूण 37,14,220/- रुपये (सदोतिस लाख चौदा हजार दोनशे विस रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सपोनि मनोजकुमार नवसरे, म.पो सविता काळे, दत्तात्रय शिंदे, विजय सरजिने, उमेश कुतवळ,विलास आंबेकर, तेजस रासकर यांनी केली आहे. सदर गुन्ह्यांचा पुढील अधिक तपास स सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे हे करत आहेत.