जिल्हा रुग्णालयाच्या आवारातून चोरी

सातारा – जिल्हा रुग्णालयाच्या आवारात लावलेल्या दुचाकीच्या डिकीत ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्‍कम लंपास झाल्याची घटना आज घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सतीश पांडुरंग उबाळे (रा. मोहितेवाडी, ता. कोरेगाव) यांनी तक्रार दिली आहे.

याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, उबाळे यांची सासू आजारी असल्याने ते जिल्हा रुग्णालयात आले होते. दिवसभर थांबल्यानंतर घरी जाताना त्यांनी जेवणाचा डबा ठेवण्यासाठी दुचाकीची डिकी उघडली तेव्हा त्यांना डिकीतील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व एक मोबाईल नसल्याचे लक्षात आले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×