चोरीला गेलेल्या प्राचीन मूर्ती इंग्लंडकडून भारताला परत

लंडन – काही वर्षांपूर्वी भारतातील आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून चोरीला गेलेली आणि दोन हजार वर्षे प्राचीन असलेली एक तर सतराव्या शतकातील एक अशा दोन कृष्ण मूर्ती इंग्लंडने भारताला परत केल्या आहे. यातील एक मूर्ती चुनखड्यापासून तर दुसरी मूर्ती कांस्य धातूची आहे तसेच ती सतराव्या शतकातली आहे असेही समजते आहे.

भारताचे उच्चायुक्त रुची घनश्‍याम यांच्याकडे या मूर्ती सुपूर्द करण्यात आल्या. 15 ऑगस्टच्या दिवशी म्हणजेच स्वातंत्र्यदिनी या दोन्ही मूर्ती परत करण्यात आल्या. अमेरिका आणि ब्रिटनच्या एका सर्च टीमने या दोन्ही मूर्तींचा शोध लावला. 15 ऑगस्टच्या दिवशी लंडन येथे असलेल्या गांधी हॉल ऑफ इंडिया हाऊसमध्ये झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर या दोन्ही मूर्ती सुपूर्द करण्यात आल्या.

या मूर्तींचं मूल्य ठरवता येणार नाहीत कारण त्या अमूल्य आहेत. या कलाकृती भारतात परत येणे हे अमेरिका आणि ब्रिटन यांचं भारतासोबत असलेल्या मैत्रीचं प्रतीक आहे असे मत घनश्‍याम यांनी व्यक्त केलं. प्राचीन वस्तूंची तस्करी करणाऱ्यानीच या मूर्ती चोरल्या असाव्यात असा आरोप होता. मात्र लंडनमध्ये ज्या एका व्यक्तीकडे ही शिल्प आढळली. या व्यक्तीचे नाव प्रशासनाने बाहेर येऊ दिले नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×