Stock Market Opening| जागतिक बाजारातील संकेतांचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर दिसून येत आहे. बुधवारी 11 सप्टेंबर रोजी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली आहे.100 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स व्यवहार करत होता, तर निफ्टी 25,015 च्या पातळीवर होता. निफ्टी बँक 51,115 च्या रेंजमध्ये व्यवहार करताना दिसत आहे. आशियाई बाजारातील कमकुवत ट्रेंडमुळे आज सुरुवातीच्या व्यवहारात देशांतर्गत बाजार घसरला.
सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 15 मध्ये वाढ तर 15मध्ये घसरण दिसून येत आहे. याशिवाय निफ्टीच्या 50 समभागांपैकी 21 शेअर्समध्ये वाढ आणि 29मध्ये घसरण दिसून येत आहेत. बँकिंग, ऑटो आणि रियल्टी शेअर्समध्ये विक्री दिसून येत आहे. शेअर बाजारात सकाळी 9.30 वाजता सेन्सेक्स 81,773.78 वर आणि निफ्टी 24,995.65 वर व्यवहार करत आहे.
कोणत्या शेअर्समध्ये वाढ ?
आयटी शेअर्समधील तेजीच्या जोरावर आयटी निर्देशांकात वाढ दिसून येत असून एफएमसीजी निर्देशांक घसरणीसह उघडला. परंतु एफएमसीजी क्षेत्रात अर्ध्या टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. तर FMCG क्षेत्रात, ब्रिटानिया तेजीत आहे परंतु ITC सर्वकालीन उच्चांकाच्या जवळ आला आहे. NSE निफ्टी 50 निर्देशांकावर BPCL, पॉवर ग्रिड कॉर्प, टाटा स्टील, JSW स्टील आणि नेस्ले इंडिया सर्वात जास्त वाढले. तर LTIMindtree, IndusInd Bank, HDFC बँक, Tech Mahindra आणि Axis Bank चे शेअर्स तोट्यात गेले.
कच्च्या तेलाच्या किमती स्थिरावल्या
कच्च्या तेलाच्या किमती तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरल्यानंतर आता स्थिरावल्या आहेत. यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (डब्ल्यूआयटी) क्रूड 0.61 टक्क्यांनी वाढून 66.15 डॉलर प्रति बॅरल झाले आहेत.
दरम्यान, मंगळवारी 10 सप्टेंबर रोजी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार चमकदार राहिला. सेन्सेक्स 362 अंकांनी वाढून बंद झाला. निफ्टी पुन्हा एकदा 25,000 च्या वर पोहोचला. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे साडेतीन लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे..