मुंबई – विप्रो या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने गुरुवारी चमकदार ताळेबंद जाहीर केला. त्यामुळे विप्रो कंपनीच्या शेअरची शुक्रवारी मोठी खरेदी झाल्यामुळे कंपनीच्या शेअरचे भाव 10 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे दिसून आले.
कंपनीने काल जाहीर केलेल्या ताळेबंद त्यानुसार कंपनीचा नफा 27 टक्क्यांनी वाढून 2,326 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या दहा वर्षात कंपनीचा हा सर्वात चांगला ताळेबंद आहे असे समजले जात आहे.
गेल्या वर्षी भारतामध्ये लॉकडाऊन सुरू करण्यात आल्यानंतर वर्क फॉर्म होम करण्यात आले होते. माहिती तंत्रज्ञान कंपन्यासाठी वर्क फॉर्म होम उपयुक्त आहे. त्यामुळे कंपनीच्या कामावर कसलाही परिणाम झालेला नाही.
उलट कंपनीच्या नफ्यात आणि उलाढालीत वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आगामी काळातही कंपनीचा नफा आणि उलाढाल वाढेल या आशेने बरेच गुंतवणूकदार या कंपनीच्या शेअरची खरेदी करीत असल्याचे ब्रोकर्सनी सांगितले.