मुंबई – सॉफ्टवेअर क्षेत्रातील टीसीएस कंपनीने बायबॅक करण्याच्या शक्यतेवर विचार चालू केला असल्यामुळे या कंपनीच्या शेअरच्या भावात तीन टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. दिवसाअखेर ही वाढ एक टक्क्यावर स्थिरावला.
कंपनीच्या संचालक मंडळाची तिसऱ्या तिमाहीचा ताळेबंद मंजूर करण्यासाठी बैठक 12 जानेवारी रोजी होणार आहे. या बैठकीमध्ये शेअरच्या फेर खरेदीच्या शक्यतेवर विचार करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
सप्टेंबरअखेर कंपनीकडे 51, 950 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या तिमाहीचा ताळेबंद चमकदार असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांनी सोमवारी सकाळी या कंपनीच्या शेअरची खरेदी केल्यामुळे शेअरचे भाव वाढले. जानेवारी 2019 मध्ये 16 हजार कोटी आणि 2018 मध्ये 16 हजार कोटी रुपयांच्या शेअरची कंपनीने फेरखरेदी केली होती.