मुंबई – ब्रिटनमध्ये नव्या स्वरूपाच्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे सोमवारी ( stock market news today ) शेअर बाजाराचे निर्देशांक तीन टक्क्यांनी कोसळले होते. मात्र पुन्हा गुंतवणुकदार नेटाने आगेकूच करीत आहत. काल निर्देशांकात एक टक्क्याने वाढ झाल्यानंतर आज पुन्हा निर्देशांक एक टक्क्याने वाढले.
बाजार बंद होताना ( bombay stock market ) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 437 अंकांनी म्हणजे 0.95 टक्क्यांनी वाढून 46,444 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 134 अंकांनी वाढून 13,601 अंकांवर बंद झाला.
मुळात भारताची स्थूल अर्थव्यवस्था मजबूत आहे. ब्रिटनमधील करोना आटोक्यात राहण्याची शक्यता असल्यामुळे गुंतवणूकदार खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे. माहिती तंत्रज्ञान, बॅंका आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरची बुधवारी जास्त खरेदी झाली.
हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फायनान्स या कंपन्यांचे शेअर वधारले. परवा अस्थिरता निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर त्यात आज सहा टक्क्यांची घट होऊन तो आता 20.5 या पातळीवर आला आहे.
अमेरिकेच्या दुसऱ्या पॅकेजमुळे काल निर्देशांकांना आधार मिळाला होता. आता ब्रेक्झिट करार होण्याची शक्यता वाढल्यामुळे आज जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानाही आधार मिळाला .
इन्फोसीस कंपनीने मर्सिडीज बेझ निर्माण करणाऱ्या डेमलर कंपनीबरोबर माहिती तंत्रज्ञान पुरवठा क्षेत्रात सहकार्याचा करार केला आहे. यातून इन्फोसिस कंपनीला 8,000 कोटी रुपयाचे काम मिळाले आहे. त्यामुळे इन्फोसिस कंपनीच्या शेअरच्या भावात बुधवारी 2.58 टक्क्यांनी वाढ झाली.
रिलायन्स सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, जागतीक अर्थव्यवस्थेत बऱ्याच अनिश्चितता रेंगाळत असल्यामुळे गुंतवणूदार सावध राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात निर्देशांकांच्या वाटचालीला मर्यादा आहेत.