मुंबई – शेअर बाजार निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे काही गुंतवणूकदार नफा काढून घेत आहेत. त्यामुळे बुधवारी शेअर बाजार निर्देशांकांत काही प्रमाणात घट नोंदली गेली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 109 अंकांनी कमी होऊन 60,029 अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 40 अंकानी म्हणजे 0.23 टक्क्यांनी कमी होऊन 17,888 अंकांवर बंद झाला. टाटा स्टीलचा शेअर तीन टक्क्यांनी कोसळला. त्याचबरोबर टेक महिंद्रा, इंडसइंड बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
मारुती सुझुकी, एनटीपीसी, टायटन, स्टेट बॅंक कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. धूातू, ऊर्जा, तेलाने व नैसर्गिक वायू, आरोग्य या क्षेत्राचे निर्देशांक पिछाडीवर राहिल. ग्राहक वस्तू आणि वाहन क्षेत्राचे निर्देशांक उंचावले.
मुख्य निर्देशांकात घट झाली असली तरी स्मॉल कॅप आणि मिड कॅप 1.11 टक्क्यांपर्यंत वाढले. अमेरिका आणि ब्रिटनच्या रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण लवकरच जाहीर होणार असल्यामुळे जागतिक बाजारात मंद वातावरण आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारातही खरेदीसाठी उत्साह दिसत नाही.