मुंबई – जागतिक बाजारातून संमिश्र संकेत आल्यानंतर भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार कमालीचे सावध झाले. दिवसभर खरेदी-विक्रीच्या लाटा आल्यानंतर बाजार बंद होताना शेअर बाजार निर्देशांकात माफक घट नोंदली गेली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 66 अंकांनी कमी होऊन 52,586 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 15 अंकांनी कमी होऊन 15,763 अंकांवर बंद झाला. सरलेल्या आठवड्यात सेन्सेक्स 388 अंकांनी तर निफ्टी 93 अंकांनी कमी झाला.
मुख्य निर्देशांक जरी कमी झाले तरी छोटया कंपन्याच्या शेअरच्या भावावर आधारीत मिड कॅप व स्मॉल कॅप 0.69 टक्क्यार्यंत वाढले. धातू, उर्जा, बॅंकींग, तेल आणि नैसर्गीक वायू या क्षेत्रांचे निर्देशांक एक टक्क्यार्यंत की झाले. तर आरोग्य, ग्राहक वस्तू या क्षेत्रांचे निर्देशांक वाढले.
सकाळी शेअर बाजारात थोड्याफार प्रमाणात सकारात्मक वातावरण होते. मात्र युरोपीयन शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाल्याचे संदेश दुपारी आल्यानंतर दुपारच्या सत्रानंतर विक्री वाढली. बजाज फिन्सर्व, स्टेट बॅंक, टाटा स्टील, एशियन पेंट्स, ऍक्सिस बॅंक या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
सन फार्मा, टेक महिंद्रा, पावर ग्रिड, बजाज ऑटो या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ होऊ शकली. सन फार्मा कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ झाल्याचे जाहीर झाल्यानंतर या कंपनीच्या शेअरचा भाव दहा टक्क्यांनी वाढला.
आशियाई शेअर बाजाराचे निर्देशांक नकारात्मक पातळीवर राहिले. सध्याच्या परिस्थितीमध्ये रुपयाचा भाव 13 पैशांनी कमी होऊन 74.42 रुपये प्रति डॉलर झाला. कच्च्या तेलाचा तेलाचा दर 0.21 टक्क्यांनी कमी होऊन 75.89 डॉलर प्रति पिंप झाला.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारानी काल 866 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली. गेल्या काही आठवड्यापासून रुपया कमकुवत होत असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूदार विक्री करीत असल्याचे वातावरण बाजारात आहे.