Stock market : सहाव्या दिवशी निर्देशांकात वाढ

सेन्सेक्‍स ची 47,000 अंकाला धडक

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी

मुंबई – भारतीय अर्थव्यवस्थेवरील परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत आहे. निर्देशांक कमालीच्या उच्च पातळीवर असूनही या गुंतवणूकदारांकडून खरेदी चालूच आहे. त्यामुळे शेअर निर्देशांकात ( stock market news today ) आज सहाव्या दिवशी वाढ झाली.

दरम्यानच्या काळात मुंबई शेअर बाजाराचा  ( bombay stock market ) निर्देशांक सेन्सेक्‍स शुक्रवारी सकाळी काही का 47 हजारांच्या पुढे गेला होता. बाजार बंद होताना सेन्सेक्‍स कालच्या तुलनेत 70 अंकांनी म्हणजे 0.15 टक्‍क्‍यानी वाढून 46,960 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा ( national stock exchange )  निर्देशांक निफ्टी ( nse nifty ) 19 अंकानी वाढून 13,760 अंकावर बंद झाला.

आजच्या तेजीचे नेतृत्व इन्फोसीस, बजाज ऑटो, स्टेट बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, टेक महिद्रा, टायटन, एशियन पेंट्‌स या कंपन्यांनी केले. तर इंडसइंड बॅंक, एचडीएफसी बॅंक, ओएनजीसी, मारुती, बजाज फिन्सर्व या कंपन्यांच्या शेअरची विक्री करून गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतला.
बाजारातील घडामोडी बाबत रिलायन्स इक्विटी या कंपनीचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, सकाळी घसरलेला निर्देशांक बॅंकांच्या शेअरची जोरदार खरेदी झाल्यामुळे नंतर वाढला. निर्देशांकांच्या एकतर्फी मागे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची गुंतवणूक कारणीभूत आहे.

भारतातील कंपन्यांचे वाढते नफे, विकास दर वाढण्याची शक्‍यता, लसीकरणाचे वेळापत्रक, कमकुवत डॉलर आणि जागतिक पातळीवरील कमी असलेले व्याजदर परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित करीत आहेत. काल गुंतवणूकदारांनी 2,355 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली. जागतिक बाजारातूनही आज सकारात्मक संदेश आल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.