शेअर बाजाराची घोडदौड सुरूच; निर्देशांकाची ऐतिहासिक नोंद 

मुंबई – एक्‍झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याचे संकेत मिळाल्यामुळे निर्देशांक उसळले असून सलग दुसऱ्या दिवशीही शेअर बाजारात उत्साह दिसून आला. निर्देशांकाने आज ३९, ५५४. २८ चा पल्ला गाठत ऐतिहासिक नोंद केली आहे.

एक्झिट पोलमधील केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या यशाच्या अंदाजाचे पडसाद सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारावर उमटले. आज शेअर बाजार सुरु होताच  निर्देशांकाने  १०४. ५८ अंकांची झेप घेत ३९, ४५७. २५ चा पल्ला गाठला. तर निफ्टीनेही २८. ८० अंकांची उसळी घेत ११, ८५७. १० चा पल्ला गाठला.

एक्‍झिट पोलमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार बहुमत मिळण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे त्या आधारावर आशावादी झालेल्या गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर शेअर खरेदी करत आहेत. त्यांनी केवळ आशावादाच्या आधारावर खरेदी केलेले आहे त्यामुळे आगामी दोन-तीन दिवसात शेअर बाजारात मोठी अनिश्‍चितता निर्माण होण्याची शक्‍यता आहे. प्रत्यक्ष मतमोजणी 23 मे रोजी सकाळी सुरू होणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.