Stock Market Crash । आठवड्याच्या शेवटच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरला आहे. बँकिंग, आयटी आणि ऊर्जा समभागांच्या विक्रीमुळे बाजारात ही घसरण झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमधूनही चमक दिसत नाही आणि दोन्ही क्षेत्रांचे निर्देशांक मोठ्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.
BSE सेन्सेक्स 81000 अंकांच्या खाली घसरला असून तो सध्या 1100 अंकांच्या घसरणीसह 80200 वर व्यवहार करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 325 अंकांच्या घसरणीसह 24,221 अंकांवर व्यवहार करत आहे. सेन्सेक्सच्या ३० समभागांपैकी भारती एअरटेल या केवळ एका समभागात वाढ होत असून उर्वरित २९ समभाग घसरणीत आहेत.
वाढणारे आणि घसरणारे शेअर्स Stock Market Crash ।
शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे इंडेक्सचे बहुतांश शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. टाटा स्टील ३.२८ टक्के, जेएसडब्ल्यू स्टील ३.१३ टक्के, इंडसइंड बँक २.८६ टक्के, ॲक्सिस बँक २.६३ टक्के, बजाज फिनसर्व्ह २.४३ टक्के, महिंद्रा २.०६ टक्के, एसबीआय १.८९ टक्के, एनटीपीसी १.८९ टक्के घसरत आहे. फक्त दोन शेअर्स, भारती एअरटेल आणि एचयूएल 1.45 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत.
गुंतवणूकदारांचे 6.80 लाख कोटी रुपयांचे नुकसान Stock Market Crash ।
शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे ६.८२ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. BSE वर सूचीबद्ध समभागांचे बाजार भांडवल 651.33 लाख कोटी रुपयांवर आले आहे, जे मागील ट्रेडिंग सत्रात 458.15 लाख कोटी रुपये होते.
हेही वाचा
‘एक देश एक निवडणूक’ अंमलबजावणी होणार का? ; लोकसभा-राज्यसभेतील नंबर गेममुळे मोदी सरकार अडचणीत ? जाणून घ्या कोणाचे किती खासदार
आरबीआयला बॉम्बने उडवण्याची धमकी ; रशियन भाषेत आला मेल, पोलिसांचा तपास सुरू