परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून शेअरबाजारात खरेदी

मुंबई –जागतिक बाजारातून संमिश्र संदेश आले तरी भारतीय शेअरबाजाराचे निर्देशांक बुधवारी वाढले. परदेशी गुंतवणूकदारांनी मंगळवारी 1170 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदार सक्रिय झाले आहेत.

बुधवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 258 अंकांनी वाढून 39,302 अंकांवर बंद झाला; तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 82 अंकांनी वाढून 11,604 बंद झाला.

अर्थव्यवस्था कमकुवत असली तरी तिला पुनरुज्जीवित करण्यासाठी रिझर्व्ह बॅंक भांडवल सुलभता कमी होऊ देणार नाही, असे आश्‍वासन रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्‍तिकांत दास यांनी सकाळी दिल्यानंतर गुंतवणूकदार बऱ्याच प्रमाणात सक्रिय झाल्याचे ब्रोकर्सनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.