Stock Market Opening| मोहरमनिमित्त काल शेअर बाजार बंद असल्याने एक दिवसाच्या सुट्टीनंतर भारतीय शेअर बाजार उघडला आहे. देशांतर्गत शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये गुरुवारी घसरण दिसून आली. आयटी वगळता निफ्टीचे सर्व क्षेत्र रेड झोनमध्ये आहेत. सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला आणि 80,514 वर उघडला. तर निफ्टी 70 अंकांनी घसरून 24,543 वर तर निफ्टी बँक 181 अंकांनी घसरून 52,215 वर उघडला.
बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप 48.8 हजार कोटी रुपयांनी घसरले आहेत, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 48.8 हजार कोटी रुपयांची घट झाली. इंडिया VIX हा शेअर बाजारातील अस्थिरता दर्शवणारा निर्देशांक सध्या 1.39 टक्क्यांच्या वाढीसह 14.42 चा स्तर दाखवत आहे. BSE वर सूचीबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांच्या शेअरचे एकूण बाजार भांडवल 451.02 लाख कोटी रुपये झाले आहे. यूएस डॉलरमध्ये त्याची किंमत 5.40 ट्रिलियन डॉलर झाली आहे.
सध्या बीएसईवर 3240 शेअर्सचे व्यवहार होत आहेत तर 1014 शेअर्समध्ये वाढ होत आहे. घसरणाऱ्या शेअर्सची संख्या 2098 असून 128 शेअर्स कोणताही बदल न करता व्यवहार करत आहेत. 128 शेअर्समध्ये 52 आठवड्यांची उच्च पातळी पाहायला मिळत आहे, तर 14 शेअर्स सर्वात कमी भावात आहेत. 96 शेअर्सवर अपर सर्किट तर 92 शेअर्सवर लोअर सर्किट दिसत आहे. Stock Market Opening|
सेन्सेक्स आणि निफ्टी शेअर्सचे अपडेट
सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी फक्त 10 शेअर वाढत आहेत आणि 20 घसरत आहेत. इन्फोसिस, टीसीएस आणि ॲक्सिस बँकेत सर्वाधिक वाढ झाली आहे. तर एशियन पेंट, एचडीएफसी बँक आणि नेस्ले यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे. टीव्हीएस मोटर्स, बजाज ऑटो या दुचाकींच्या शेअर्समध्येही घसरण दिसून आली.
ओएनजीसी टॉप गेनर ठरला असून 2.61 टक्क्यांनी वाढला आहे तर ट्रेंट 2.49 टक्क्यांनी घसरला आहे. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 31 शेअर्स तेजीत आहेत आणि 19 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. तर बजाज ऑटो सर्वात जास्त 2.28 टक्क्यांनी घसरला आहे. Stock Market Opening|
हेही वाचा:
पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना अखेर अटक; पोलिसांची मोठी कारवाई