stock market : शेअर निर्देशांकात अल्प वाढ

मुंबई – जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आले तरी भारतीय शेअर बाजारात मात्र थोडीफार खरेदी होऊ होऊन निर्देशांकात अल्प वाढ झाली. जागतिक पातळीवर शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले आहेत. त्यामुळे करेक्‍शन होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

त्यामुळे मोठ्या कंपन्यांच्या शेअरकडे गुंतवणूकदार दुर्लक्ष करीत आहेत. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स केवळ 54 अंकांनी वाढून 58,305 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 15 अंकांनी वाढून 17,369 अंकांवर बंद झाला.
भारती एअरटेल, नेस्ले, टाटा स्टील, बजाज फिन्सर्व, एचसीएल टेक, आयटीसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज ऑटो, ऍक्‍सीस बॅंकेच्या शेअरच्या भावात घसरण झाली.

जिओजी फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक सल्लागार व्ही के विजयकुमार यांनी सांगितले की, जागतिक बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजारातही करेक्‍शनबाबत चर्चा चालू झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत. याच कारणामुळे आज जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.