“साई’च्या केंद्रात होणार होत्या चाचण्या
पुणे – भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे (साई) देशातील सर्व क्रीडा प्रकारातील खेळाडूंच्या उत्तेजक द्रव्य सेवन चाचण्या घेण्यात येणार होत्या. मात्र, साईकडून सराव शिबिर सुरू करण्यात आले असले तरीही सर्व खेळाडू बंगळुरू येथील केंद्रात नसल्याने कर्मचारी संख्या अपुरी ठरणार आहे. त्यामुळे या चाचण्या कधी घेण्यात येणार हे साईकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.
या चाचण्या मार्चमध्ये होणार होत्या. मात्र, करोनाचा धोका वाढत गेल्याने लॉकडाऊन करण्यात आले व सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धांवर निर्बंध घालण्यात आले. टोकियो ऑलिम्पिक, आयपीएल, विम्बल्डन यांच्यासह युरोपातील फुटबॉल स्पर्धा स्थगित केल्या गेल्या. तसेच काही स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या. आता युरोपात करोनाचा धोका कमी झाल्यानंतर बुंदेसलीगा स्पर्धा सुरू झाली आहे. टोकियो ऑलिम्पिक पुढे गेल्याने खेळाडूंना ऑलिम्पिकला पात्र होण्याच्या संधी असलेल्या अनेक स्पर्धा होणार आहेत.