शारजा – आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स व किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात आज वर्चस्वाचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी फलंदाजी बळकट करण्यावर भर दिला असला तरीही या सामन्यासाठीची खेळपट्टी पाहता फिरकी गोलंदाज चमत्कार करतील अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राजस्थान विरूध्द पंजाब यांच्यातील सामन्यास थोडयाच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल राजस्थान राॅयल्सच्या बाजूने लागला आहे. कर्णधार स्टिव स्मिथने गोलंदाजी स्विकारताना किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
Steve Smith has won the toss and #RR will bowl first in Match 9 of #Dream11IPL.#RRvKXIP pic.twitter.com/XXSqoCx2HY
— IndianPremierLeague (@IPL) September 27, 2020
दरम्यान, शारजाच्या खेळपट्टीवर किमान 200 ते 220 धावा होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या खेळपट्टीचा इतिहास पाहता ही खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन ठरणार आहे. मात्र, दुसऱ्या डावात गोलंदाजांना मैदानातील दवामुळे चेंडू ग्रीप करताना कठीण जाणार आहे.