Mahakumbh Mela 2025: उत्तर प्रदेशच्या प्रगायगराज येथे जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा असलेल्या महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आहे. जगभरातून कोट्यावधी भाविक या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. अॅपलचे दिवगंत सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स या देखील महाकुंभ मेळ्यात उपस्थित आहेत. यातच आता स्टीव्ह जॉब्स यांनी कुंभबाबत 50 वर्षांपूर्वी लिहिलेले पत्र चर्चेत आले आहे. या हस्तलिखित पत्राची लिलावात तब्बल 4.32 कोटी रुपयांना विक्री झाली.
स्टीव्ह जॉब्स यांनी 1974 साली कुंभमेळ्याबद्दल पत्र लिहिले होते. हाताने लिहिलेल्या या पत्रातून स्टीव्ह यांची भारत आणि अध्यात्माबद्दलची आवड दर्शवते. त्यांनी हे पत्र त्यांचे लहानपणीचे मित्र टिम ब्राउन यांना लिहिले होते.
पत्राची 4 कोटींना विक्री
स्टील्ग जॉब्स यांनी लिहिलेले हे 50 वर्ष पत्र खरेदीसाठी लिलावात उपलब्ध करण्यात आले होते. लिलाव करण्यात आलेले त्यांचेहे पहिलेच पत्र आहे. लिलावात एका व्यक्तीने या पत्राला जवळपास 4.32 कोटी रुपयात खरेदी केले.
स्टीव्ह जॉब्स यांनी पत्रात काय लिहिले होते?
या पत्रात स्टीव्ह जॉब्स यांनी लिहिले होते की, ‘मला एप्रिलमध्ये सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी भारतात जायचे आहे. मार्च महिन्यात मी कधीतरी येईन, मात्र हे अद्याप निश्चित झालेले नाही.’ त्यांनी शांती या शब्दासह पत्राचा शेवट केले आहे. याशिवाय, त्यांनी त्यांच्या भारतातील संभाव्य दौरा व येथील संस्कृती, शिक्षण याविषयी लिहिले होते.
कुंभमेळ्यासाठी स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी भारतात
दिवगंत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स या महाकुंभमेळ्यासाठी भारतात आल्या आहेत. त्यांना निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी महाराज यांनी ‘कमला’ हे नाव दिले. तसेच, त्यांचे ‘अच्युत-गोत्र’ देखील दिले. त्या महाकुंभ मेळ्यातील विविध कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत.