अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर सोशल मीडिया आणि बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये वाद-विवाद विकोपाला गेला आहे. यात स्टार किड्सना ट्रोल केले जात आहे. अनेक स्टारनी नेहमीच ट्रोल केले जात असल्यामुळे सोशल मीडिया अकाउंट बंद केले आहे.
आलिया भट्ट आणि अनन्या पांडे यांनी सोशल मीडियावरील कमेंट सेक्शन ऑफ केले आहे. यामुळे त्यांनी केलेल्या पोस्टवर कुणीही कमेंट करू शकणार नाही.अभिनेत्री सोनम कपूर हिने सर्वात अगोदर कमेंट सेक्शन ऑफ करण्याचे पाऊल उचलले. तिच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक स्टार किड्सनी आपले सोशल मीडियावरील कमेंट सेक्शन ऑफ केले आहे.
करीना कपूर आणि करण जोहरने कमेंट सेक्शनवर मर्यादा घातली आहे. आता त्यांच्या पोस्टवर फक्त त्यांचे क्लोजड फ्रेंड कमेंट करू शकतात. इतर कुणीही त्यांच्या पोस्टवर कमेंट करू शकणार नाहीत.
शाहरूख खानची मुलगी सुहाना हिनेही कमेंट सेक्शन ऑफ केले आहे. स्टार किड्सना सोशल मीडियावर टार्गेट करून त्यांना ट्रोल केले जात असल्यामुळे स्टार किड्स असलेले आलिया आणि अनन्या यांनी हे पाऊल उचलले आहे.