नेल्लूर – आंध्र प्रदेशातील नेल्लूरमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 14 वर्षीय मुलीवर तिच्याच सावत्र बापाने अत्याचार केल्यी घटना घडली आहे. यामुलीवर मागील सहा महिन्यांपासून सतत अत्याचार करत होता. या घटनेमुळे परिसरात संताप केला जात आहे.
या मुलीवर अत्याचार करत असल्याचा खुलासा पीडितेच्या 10 वर्षीय भावाने केला आहे. सावत्र बाप त्याच्या बहिणीसोबत चुकीचे कृत्य करत होता, हे पाहताच तो जोराने ओरडला. मुलाचा आवाज ऐकताच शेजारी इथे पोहोचले मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाला होता.
पीडितेने याआधीही याबाबत तिच्या आईला सांगितले होते. मात्र तिला आपल्या मुलीच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. दरम्यान आज या प्रकाराचा खुलासा झाला आणि हा प्रकार समोर आला.
याप्रकरणी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका स्थानिक महिला असोसिएशन या घटनेची तक्रार दाखल केली होती. पुढील तपास पोलिस करत आहेत.