अल्पवयीन मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या सावत्र आईचा जामीन फेटाळला

पुणे: शारीरिक आणि मानसिक त्रास देत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात सावत्र आईचा जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.व्ही.रोट्टे यांनी फेटाळला. रोहिणी संतोष नळकांडे (वय 29, रा. कवठे यमाई, ता. शिरूर) असे जमीन फेटाळण्यात आलेल्या आईचे नाव आहे.

तिचा पती संतोष खंडू नळकांडे (वय 38, रांजणगाव गणपती, ता. शिरूर) याने याबाबत फिर्याद दिली आहे. अमृता असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. तिने रांजनणगाव गणपती येथे राहत्या फ्लॅटमध्ये 30 डिसेंबर 2018 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रोहिणी हिने मारहाण, क्षमतेपेक्षा जास्त काम सांगत तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर रोहिणीने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. जरी दोषारोपपत्र दाखल झाल असले, तरीही परिस्थितीत कोणताही बदल झाला नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्याने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. घटनेनंतर ती चार महिने फरार होती. जामीन मिळाल्यास पुन्हा फरार होण्याची शक्‍यता आहे. तिच्या सख्या भावाने रोहिणी हिने मयत अमृता हिचा छळ केल्याचे जबाबात म्हटले आहे. त्यामुळे तिचा जामीन फेटाळण्याची मागणी ऍड. बोंबटकर यांनी केली होती. त्यानुसार न्यायालयाने तिचा जामीन फेटाळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)