नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठी पोलाद खनिज कंपनी असलेल्या एनएमडीसीने पोलाद खनिजाची किंमत प्रति टनाला तब्बल 1,100 रुपयांनी कमी केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामुळे पोलाद तयार करणाऱ्या कंपन्यांना कमी दरावर खनिज मिळणार आहे. त्या प्रमाणामध्ये पोलादाच्या किमती आगामी काळात कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या कंपनीने शेअर बाजारांना पळविलेल्या माहितीत म्हटले आहे की या अगोदर पोलाद खनिजाची किंमत प्रति टनाला 4,400 रुपये इतकी करण्यात आली आहे.
अगोदर या खनिजांची किंमत प्रति टनाला 5,500 रुपये इतकी होती. मागणीपेक्षा पोलाद खनिजाचे उत्पादन जास्त झाल्यामुळे पोलाद खनिजाची किंमत कमी करण्यात आली असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. गेल्या वर्षी भारतामध्ये 250 दशलक्ष टन पोलाद खनिज तयार करण्यात आले.
मात्र त्यापैकी फक्त 192 दशलक्ष टनाचा वापर झाला आहे. त्यामुळे 50 दशलक्ष टन एवढी खनिज पडून आहे. ते बाजारात लवकर विकले जावे याकरिता खानिजाची किंमत कमी करण्यात आली आहे. याबाबत विश्लेषकांनी सांगितले की, एनएमडीसीने घेतलेल्या या निर्णयामुळे आगामी काळामध्ये पोलादाच्या किमती प्रति टनाला 2,000 ते 2,500 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.
असे असले तरी खनिज उद्योगासमोर रेल्वेच्या वाघिणी उपलब्ध नसल्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या रेल्वेच्या वागिनी जास्त प्रमाणात कोळसा पुरवठ्यासाठी वापरल्या जातात. त्यामुळे पोलादाचे खनिज वाहून नेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. हा प्रश्न रेल्वे आणि पोलाद उद्योगाने सोडविण्याची गरज असल्याचे सांगितले जाते. केंद्र सरकारने पोलादासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्कात कपात केली आहे. या सर्व बाबींचा सकारात्मक परिणाम आगामी काळात होण्याची शक्यता आहे.