आपल्या जवळ नाही आला अजून कोरोना म्हणून मस्त फिरायचे…
एक दिवस सगळ्यांनाच मरायचे..!
आपल्या जवळचा, नात्यातला कुठे कोण्ही सापडला आहे अजून त्यामुळे आम्ही बेफिकीर राहायचे…
एक दिवस सगळ्यांनाच मरायचे.!
तुम्हा आम्हा सारख्या एकाच्या चुकीने बाहेर फिरून अख्खा कुटुंबच उध्वस्त करायचे…
एक दिवस सगळ्यांनाच मरायचे.!
सरकार आहे वेडं ते ओरडून आम्हला सांगतय की, बाबांनो घरात बसा पण आम्हला कुठे ते ऐकायचे…
कारण एकदिवस सगळ्यांनाच मरायचे.!
प्रगत राष्ट्र या कोरोना पुढे हतबल झाली, मृत्यू ने ही तेथे तांडव मांडला हे आम्हाला कुठे समजावून घ्यायचे…
कारण एकदिवस सगळ्यांनाच मरायचे.!
देवावरती श्रद्धा तुमची, करेन तो आपले रक्षण म्हणून त्यावर अवलंबून राहायचे, पण त्याचीच इच्छा असे समजून थोडे दिवस घरातच राहायचे…
कारण एक दिवस सगळ्यांनाच मरायचे.!
एक दिवस कोरोनाला देखील असेच मारायचे…
एक दिवस कोरोनाला देखील असेच मारायचे…
त्यासाठी आज घरात राहून लढायचे.!
# काळजी घ्या सर्वांनी. घरात रहा, सुरक्षित रहा आणि या कोरोना सारख्या जीवघेण्या रोगावर मात करूया…उगाच भंपक गोष्टी करू नका की कधी ना कधी मरायचे आहे म्हणून गाफिल राहून दुर्दैवी अंत ओढावून घेऊ नका.
Stay at Home, Stay Safe.
– तेजस भगवान विधाते, पुणे