नवी दिल्ली – कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या 21 जूनपासून सुरू झालेल्या नव्या टप्प्यात, देशातील लस निर्मात्यांनी उत्पादित केलेल्या लसीच्या एकूण साठ्यापैकी 75 टक्के साठ्याची खरेदी करून केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीचा मोफत पुरवठा करत आहे.
आतापर्यंत सरकारने खरेदी केलेल्या मात्रांचा मोफत पुरवठा आणि राज्यांनी केलेली लसीची थेट खरेदी यांच्या माध्यमातून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत एकूण 134 कोटींहून अधिक मात्रांचा पुरवठा करण्यात आला आहे.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांकडे कोविड प्रतिबंधक लसीच्या न वापरलेल्या अशा 22 कोटी 16 लाखांहून अधिक मात्रा, यापुढील काळात लसीकरण करण्यासाठी अजूनही शिल्लक आहेत, अशी माहिती केंद्र सरकारच्यावतीने देण्यात आली आहे.