पौड (वार्ताहर) – मुळशीतील कोतवालांचे विविध मागण्याकरिता मुळशी तहसीलदार रणजित भोसले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आमच्या मागण्या सरकार पर्यंत पोहवविण्यासाठी सहकार्य करावे असे कोतवालांच्या वतीने तहसीलदारांना सांगण्यात आले.
कोतवालांच्या विविध मागण्याबाबत महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने दि.२७/०६/२०२४ रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसुल मंत्री यांना दिलेल्या निवेदनास तालुका कोतवाल संघटना चा पूर्ण पाठिंबा व सहभाग मुळशीतील कोतवाल असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
यावेळी अमित भंडलकर अध्यक्ष मुळशी तालुका कोतवाल संघटना, प्रकाश दिघे उपाध्यक्ष, चंद्रकांत हुल्लावळे कार्याध्यक्ष, गणेश पवार सचिव, बापू महाडिक सहसचिव आदी.. उपस्थित होते.
कोतवालांच्या मागण्या :
१) राज्यातील सर्व कोतवालांना चतुर्थ श्रेणी लागू करण्या बाबत.
२) तलाठी व लिपीक पदामध्ये २५% कोटा राखीव ठेवण्यात बाबत.
३) सेवा निवृत्त कोतवाल यांना पेन्शन व अनुकंप लागू करण्या बाबत.
४) कोतवाल पदाचे नाव बदलवून तलाठी सहाय्यक किंवा महसूल सेवक करणे बाबत.
५) सेवा निवृत्त कोतवाल यांना ३०० दिवसाचे रजा रोखीकरण मिळणे बाबत.
६) कोतवालमधून शिपाई पदावर देण्यात येणारा ४०% कोटा वाढवून तो ८०% करावा.
७) ८ फेब्रुवारी २०१९ शासन निर्णयानुसार अटल पेन्शन बाबत सुधारीत जी.आर.काढणे बाबत.
कोतवालांच्या आंदोलनाचे स्वरूप आणि टप्पे :
दि.०१/०७/२०२४ सोमवार रोजी तहसिलदार यांना आंदोलनाबाबत नोटीस देणे
दि.०४/०७/२०२४ गुरुवार व दि.०५/०७/२०२४ शुक्रवार रोजी आझाद मैदान मुंबई धरणे आंदोलन
दि.१०/०७/२०२४ बुधवार रोजी जिल्हाधिकारी कार्यलया समोर बेमुदत काम बंद आंदोलन
दि.२२/०७/२०२४ सोमवार रोजी लोणी जि. अहमदनगर येथे बेमुदत आमरण उपोषण