हमाल, मापाडी महामंडळाचे विविध मागण्याचे शरद पवार यांना निवेदन

पुणे(प्रतिनिधी) – राज्यातील कामगार विभागातील रिक्त पदे भरावीत, राज्याचे माथाडी सल्लागार मंडळ नियुक्त करण्यात यावे, सर्व महसूल विभागातील कामगार प्रतिनिधींना प्रतिनिधीत्व मिळावे, स्थानिक माथाडी मंडळाची रचना तातडीने करावी आदी मागण्यांबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले.

डॉ. बाबा आढाव यांनी बारामती हॉस्टेल येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी, कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे उपस्थित होते.

माथाडी मंडळाने हप्ताची कपात पुर्वीप्रमाणे करावी याबाबतचे आदेश राज्यशासनाने त्वरीत काढावे, कष्टकऱ्यांना आपतकालीन स्थितीत विमा संरक्षण उपलब्ध करून द्यावे, राज्यातील तोलणारांबाबत सुनील पवार समितीचा अहवाल स्विकारावा तसेच राज्यशासनाने महाधिवक्ता यांचेमार्फत बाजू मांडून तोलणारांचा रोजगार वाचवावा, राज्यातील शासकीय धान्य गोदामातील कंत्राटी पध्दत बंद करण्यात यावी, राज्यातील माथाडी मंडळे जीएसटीमधून वगळावीत, हमालांच्या मजुरीमधून टीडीएस कपात केला जावू नये. याखेरीज मालधक्‍क्‍यावर कामगारांसाठी किमान नागरी सुविधा असाव्यात तसेच पुणे रेल्वे स्टेशन येथील मालधक्का पुर्ववत सुरू करण्यात यावा आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.