मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर आक्रमक टीका केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर विशेष हक्कभंग सादर केल्यानंतर अशोक चव्हाण यांच्याविरोधातही हक्कभंग आणणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, सभागृहात अशोक चव्हाण यांनी आज मराठा आरक्षणासंदर्भात खोटे निवेदन केले. १०२ची घटनादुरूस्ती मराठा आरक्षण कायद्याला लागू होत नाही.
अॅटर्नी जनरलसंदर्भातील वक्तव्य चुकीचे केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता.