पवनानगर – मावळ तालक्यातील कोथुर्णे गावातील अ घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या शिष्टमंडळाने उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेतली.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मावळच्या लेकीला लवकरात लवकर न्याय मिळवुन देण्यात येईल. मी या प्रकरणात स्वतः लक्ष घालणार असून या प्रकरणासाठी चांगल्यात चांगला वकील देणार असून ही केस फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवणार आहे. या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा कशी होईल, यासाठी प्रयत्न करणार आहे. पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून पाच लाख रूपयांची आर्थिक मदत करण्यात येईल.
या वेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले की, या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा लढा शेवटपर्यंत सुरू ठेवणार आहे. शासनाच्या वतीने या कुटुंबाला जी काही मदत करता येईल, ती करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.आरोपीला फाशीची शिक्षा होऊन पीडितेला न्याय मिळेपर्यंत बजरंग दल पाठपुरवठा करत राहणार आहे, अशी माहिती विभाग संयोजक संदेश भेगडे यांनी दिली.
यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, विभागमंत्री संदेश भेगडे, भाजप संघटन मंत्री गणेश ठाकर, जनार्दन चांदेकर, गणेश सावंत, सह संयोजक बजरंग दल बाळा खांडभोर, प्रशांत ठाकर, नीलेश ठाकर, सुनिल ढोरे, अक्षय येळवंडे, विश्वास दळवी, नीलेश खेंगरे, महेश सोनार आदी पदाधिकारी उपस्थित होते.