राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांची हडपसर पोलीस स्टेशनला सरप्राईज भेट

हडपसर (प्रतिनिधी) – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज हडपसर येथील पोलीस स्टेशनला सरप्राईज भेट दिली.त्यावेळी त्यांनी येथील भरोसा सेल, दक्षता कमिटी, निर्भया पथक आणि दामिनी पथक यांची माहिती घेतली.

दरम्यान हडपसर मध्ये इंडस्ट्रीएल आणि आयटी कंपनी मध्ये महिला कामगारांची संख्या मोठी असून येथील महिलांना काही तक्रारी असल्यास त्यांनी तत्काळ 1091 या हेल्पलाईन नंबर तसेच महिला आयोगाच्या मेलवर तक्रार द्यावी ,असे आवाहन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.

महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस दलात निर्भया, दामिनी पथके कार्यान्वित आहेत. सकाळी ते रात्री पर्यंत सार्वजनिक ठिकाणे, शैक्षणिक संस्था आणि बाजारात ही पथके गस्तीवर असतात. आता महिला सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसदलातील यंत्रणा अधिक सतर्क करण्यात येत असून पोलिसदलाच्या वतीने हेल्पलाइन सुविधेत मोबाईल नंबर, व्हॉट्‌सऍप आणि टोल फ्री नंबरचा समावेश करण्यात आला आहे.

येणाऱ्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्याच्या सूचनाही नियंत्रणकक्षासह सर्वच पोलिस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. असेही यावेळी चाकणकर यांनी सांगितले. दरम्यान नागरिकांनी खास करून महिला तरुणींनी 1091 या हेल्पलाइनचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.