पुणे – महाराष्ट्र राज्य कुस्ती फेडरेशन यांच्या कडून राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. विविध वयोगटात ही स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. १२ ऑगस्ट पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमध्ये वयोगट १५ ते २० वर्षाखालील फेडरेशन कप त्याच बरोबर २३ वर्षांखालील ३६ व्या राज्य कुस्ती संघाची निवड केली जाणार आहे. संपूर्ण स्पर्धा पुण्याजवळ असलेल्या वारजे माळवाडी येथे असलेल्या सह्याद्री संकुल वारजे, याठिकाणी पार पडणार आहे.
स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी ८ ते १० यावेळेत वजने होणार असून स्पर्धा सकाळी ११ वाजता सुरु होणार आहे. सदर स्पर्धा १२ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट या कालावधी विविध वयोगटात खेळविण्यात येणार आहे. दरम्यान स्वातंत्र्य दीनानिमित्त १५ऑगस्ट रोजी कोणतीही स्पर्धा खेळविण्यात येणार नाही.
संपूर्ण स्पर्धा स्पर्धेच्या नियमानुसार होणार असून पंचाचा निर्णय अंतिम असणार आहे, अध्यक्ष अस्थायी समिती ,महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेच्या अस्थायी समितीचे अध्यक्ष संजय सिंग यांनी सांगितले.
अशी रंगणार निवड चाचणी स्पर्धा
दिनांक १२ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणी
दिनांक: १३ ऑगस्ट रोजी १५ वर्षाखालील फ्रीस्टाईल निवड पाणी स्पर्धा.
दिनांक १४ ऑगस्ट रोजी १५ वर्षाखालील ग्रीक रोमन व मुली यांची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा
दिनांक १६ ऑगस्ट रोजी २० वर्षाची फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धा
दिनांक: १७ ऑगस्ट रोजी २० वर्षाखालील ग्रीक रोमन व मुलीची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा
दिनांक १८ ऑगस्ट २३ खालील ग्रीक रोमन फ्रीस्टाईल व महिलांची निवड स्पर्धा