आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे जादा उत्पादन

राज्य साखर संघाचे अध्यक्ष दांडेकर

सोमेश्‍वरनगर – आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे उत्पादन जादा झालेले आहे. आरोग्यामुळे साखर खाण्याच्या कल कमी झालेला आहे. पाऊस असलेल्या भागात ऊस लागवडी वाढत आहेत. अशावेळी शासकीय मदतीची वाट न पाहता साखर कारखान्यांनी आपापल्या पायावर उभे राहण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेकर यांनी व्यक्‍त केले

सोमेश्‍वरनगर (ता. बारामती) येथे सोमेश्‍वर सहकरी कारखाना आणि महाराष्ट्र साखर संघ यांच्या संयुक्‍त विद्यमाने पुणे आणि सातारा या जिल्हातील सहकारी साखर कारखाना अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक यांच्या एक दिवससीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी दांडेकर बोलत होते. यावेळी सोमेश्‍वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, महाराष्ट्र साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीरंग शेटे, कार्यकारी संचालक संजय खताळ, छत्रपती करखण्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, सोमेश्‍वरचे उपाध्यक्ष शैलेश रारकर यांच्यासह सर्व कारखान्याचे अध्यक्ष, सदस्य व कार्यकारी संचालक आदी मान्यवर उपस्थित होते.

जयप्रकाश दांडेकर म्हणाले की, साखरेचा उठाव वर्ष दीड वर्ष होत नाही, राज्य बॅंकेला पोत्याचे व्याज भरावे लागत आहे, यासाठी कारखान्यांनी इथेनॉलकडे वळणे गरजेचे आहे. मागील चार वर्षांत दुष्काळ, साखरेची न होणारी उचल यामुळे शंभर सहकारी साखर कारखान्यांपैकी 70 साखर करखान्यांपुढे अनेक अडचणी आहेत. गेल्या 10 वर्षांत सरकारचे कएखान्यांना सहकार्य नाही, सहकार ही गरीब शेतकऱ्यांची चळवळ असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, सोमेश्‍वरचे संचालक सुनील भगतर नीरा भीमाचे कार्यकरी संचालक धीरज माने, सोमेश्‍वरचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, माळेगावचे कार्यकारी संचालक विजय वाबळे यांनी चर्चेत सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन यादव, प्रस्ताविक संजय खताल तर श्रीरंग शेटे यांनी आभार मानले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.