पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत येत्या दि.13 ते 15 जुलैदरम्यान राज्य सेवा मुख्य परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांनी हॉलतिकीट आयोगाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावेत, असे आवाहन आयोगाने केले आहे.
आयोगाने मुख्य परीक्षेसाठी ऑनलाइन केलेल्या अर्ज केलेल्या उमेदवारांच्या प्रोफाइलमध्ये प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेसोबत आणणे अनिवार्य आहे. परीक्षेच्या वेळी प्रवेश आणणे सक्तीचे आहे. त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. तर, प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वत:च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. परीक्षेला येताना कोणतेही एक छायाचित्र असलेले मूळ ओळखपत्र पुरावा म्हणून आवश्यक असल्याचे आयोगाने म्हटले आहे.