…अन्यथा ‘या’ निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढवेल – प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

माण तालुक्‍यात कॉंग्रेसची विस्कटलेली घडी पुन्हा बसवणार; प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हसवडच्या माजी नगराध्यक्षांनी मुंबईत घेतली भेट

म्हसवड (प्रतिनिधी) – आगामी जिल्हा बॅंक व पालिका निवडणुका कॉंग्रेस पक्ष लढवणार आहे. राज्याप्रमाणे स्थानिक पातळीवरही सन्मानपूर्वाक आघाडी झाली तर ठीक अन्यथा पक्ष स्वबळावर या निवडणुका लढवेल. माण तालुक्‍यात पक्षाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवणार आहे, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी केले.

म्हसवडचे माजी नगराध्यक्ष व कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष विजय धट आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दादासाहेब काळे यांनी नाना पटोले यांची मुंबई येथे विधान भवनातील कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी सातारा जिल्हा बॅंक, नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकांच्या संदर्भात चर्चा झाली. माण तालुक्‍यात पक्ष मजबूत करून सर्व निवडणुका ताकदीने लढण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देणे आवश्‍यक आहे.

पक्षवाढीसाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. माण-खटाव या तालुक्‍यांमधील विविध प्रश्नांसाठी जे जे करणे आवश्‍यक आहे, ते ते करण्यात येईल. पक्षात राहून गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. पक्षबांधणीसाठी तरुण रक्ताला राजकारणात प्राधान्य देणार आहे. माण-खटावमधील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या भागाचा लवकरच दौरा करणार असल्याचे पटोले म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.