नियंत्रण? ‘छे, आमच्याकडे आकडेवारीच नाही!’

अधिकाऱ्यांचे हात वर : औद्योगिक प्रदूषणाबद्दल मंडळ पूर्णपणे अनभिज्ञ

संकेतस्थळही “अपडेट’ करण्यासही वेळ मिळेना

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – विविध प्रदूषणाबाबत देखरेख, मोजणी, नियंत्रण आणि पर्यावरण नियमांच्या उल्लंघनाबाबत कारवाईची जबाबदारी असणाऱ्या राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामाबाबत मंडळाचे अधिकारीच अनभिज्ञ आहेत. मंडळातर्फे हवा, पाणी आणि औद्योगिक प्रदूषण नियंत्रणासंदर्भात केल्या जाणाऱ्या विविध कामांबाबत मंडळाच्या माहिती अधिकाऱ्यांकडेच माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासून मंडळाचे संकेतस्थळही “अपडेट’ केले नसल्याने शहरातील मंडळाच्या अधिकाऱ्यांना माहितीसाठी मुंबई येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागतो.

प्रदूषण नियंत्रण मंडळ ही प्रदूषणासंदर्भात काम करणारी राज्यातील एक महत्त्वपूर्ण शासकीय संस्था आहे. संस्थेमार्फत राज्यभरातील हवा, पाणी, कचरा आणि औद्योगिक क्षेत्रात होणारे प्रदूषण रोखण्याबाबत काम केले जाते. याअंतर्गत राज्यातील भूजल, नद्या, तलाव, धरणांतील जल गुणवत्ता चाचणी, विविध शहरांतील हवेची गुणवत्ता पडताळणे, शहरांतर्गत घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाते, की नाही याबाबत पाहणी तसेच विविध उद्योगांकडून होणाऱ्या प्रदूषणाबाबत पाहणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. प्रदूषणाबाबत केल्या जाणाऱ्या पाहणीची “रिअल टाइम’ माहिती मिळावी, यासाठी मंडळातर्फे संगणक यंत्रणा देखील विकसित करण्यात आली आहे. पण, असे असूनही मंडळाच्या पुणे विभागातील अधिकाऱ्यांना याबाबत फारशी माहिती नसल्याची बाब समोर आली आहे.

मंडळाकडे तांत्रिक क्षेत्रात कुशल असणाऱ्या अधिकाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे यंत्रणा असूनही ती हाताळण्याची क्षमता येथील अधिकाऱ्यांकडे नाही. संकेतस्थळ “अपडेटेशन’ मुंबई येथील मुख्यालयाकडून होते. मात्र, गेली अनेक महिने याबाबत कोणतेही काम झाले नाही. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांना बहुतांश वेळा मुंबई येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घ्यावी लागते.
– आर. बी. सोरटे, माहिती अधिकारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)