राज्यात बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरला

पुणे – राज्यात बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरला असून कोकण आणि घाट माथ्यावर पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मात्र पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. ही स्थिती आणखी एक ते दोन दिवस राहण्याची शक्‍यता आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र हे उत्तरेकडे सरकल्याने उत्तरेकडील राज्यांमध्ये चांगला पाऊस पडत आहे. हे क्षेत्र सध्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. या क्षेत्रांचे चक्राकार वाऱ्यामध्ये रुपांतर झाल्याने पावसाचा जोर आगामी काळात या भागांत वाढणार आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तर प्रदेशपासून ओरिसा राज्यापर्यंत पसरलेले आहे. त्यामुळे सध्या राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. येत्या सोमवारपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे आणखी एक क्षेत्र निर्माण होणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात राज्यात पुन्हा पावसाचे पुनरागमन होण्याची शक्‍यता हवामान खात्याकडून व्यक्त होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, शुक्रवारी कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांतील अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातही सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात तुरळक ठिकाणी हलक्‍या सरी बरसल्या. मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली असून, अनेक भागांत ढगाळ हवामान होते. विदर्भातही बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागांत हलका पाऊस पडला. पुणे शहरात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण पाहायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)