मावळ : राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत विश्‍वकल्याण शाळेचे यश

पारूल, रितेश व प्रांजल उत्कृष्ट स्केटर

मावळ – शिरवळ (खंडाळा) येथे झालेल्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत विश्‍वकल्याण शाळेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून दोन सुवर्ण, एक रौप्य व पाच कांस्य पदकांची कमाई केली. स्पर्धेत एकूण 350 स्पर्धकांनी विविध जिल्ह्यांतून सहभाग नोंदवला.

पारूल गर्जे, रितेश ताटे व प्रांजल महाजन यांनी उत्कृष्ट कामगिरी करत बेस्ट स्केटरची ट्रॉफी पटकावली. विजेत्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे – पारूल गर्जे (सुवर्ण पदक), देवांश गीते (कांस्य पदक), राज पारेख (कांस्य पदक), प्रणव वाघमोडे (कांस्य पदक), रितेश ताटे (रौप्य पदक), ललित परमार (कांस्य पदक), सोहम एखंडे (कांस्य पदक), प्रांजल महाजन (सुवर्ण पदक). विश्‍वकल्याण शाळेच्या मुख्याध्यापिका गायत्री धामणेकर व पर्यवेक्षिका दीपाली करंदीकर यांनी खेळाडूंचा सत्कार केला. सर्व खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक प्रीतम इचके यांचे मार्गदर्शन लाभले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.