पुणे – पुण्याच्या स्वराज कोकाटे, तृप्ती चांदवडकर यांनी राज्यस्तरीय ओपन ताऊल ऑनलाईन वुशू
स्पर्धेत आपापल्या गटात विजेतेपद मिळवले. करोनाचा धोका कायम असल्याने ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने खेळविण्यात आली होती व त्याला प्रचंड प्रतिसादही लाभला. भारतीय वुशू संघटना व महाराष्ट्र राज्य वुशू संघटनेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेतून राष्ट्रीय वुशू स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेतील इव्हेन्ट हा खेळाडूने घरातच करायचा होता. घरातच ऑनलाइन येत कौशल्य सादरीकरण करायचे होते. या स्पर्धेत राज्यातील 155 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता, असे महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे महासचिव सोपान कटके यांनी सांगितले.
स्पर्धेचे ऑनलाइन उद्घाटन भारतीय वुशू संघटनेचे अध्यक्ष भुपेंद्रसिंग बाजवा यांच्या हस्ते करण्यात आले. या ऑनलाइन सोहळ्याला भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सहसचिव नामदेव शिरगावकर, भारतीय वुशू संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहेल अहमद, अखिल महाराष्ट्र वुशू संघटनेचे अध्यक्ष संभाजी झेंडे, सोपान कटके आदी उपस्थित होते. तर स्पर्धेच्या समारोपप्रसंगी औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले, डॉ.सुनील तनेजा उपस्थित होते.
प्रथम क्रमांक विजेत्यास सुवर्णपदक व प्रशस्तीपत्रक, व्दितीय क्रमांक विजेत्यास रजतपदक व प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांकास ब्रॉंझपदक व प्रशस्तीपत्रक तसेच चतुर्थ क्रमांक विजेत्यास ब्रॉंझपदक व प्रशस्तीपत्रक देण्यात आले. संदीप शेलार, निलेश वाळींबे, भूषण मराठे, प्रतीक्षा शिंदे यांनी पंच म्हणून काम पाहिले.
निकाल – नानकून – वरिष्ठ पुरुष – स्वराज कोकाटे (पुणे) – 8.50 गुण, गजानन पवार (पुणे) – 8.25, निखिल जाधव (पुणे) – 8.00, स्वराज बादस्कर (पुणे) – 7.90. वरिष्ठ महिला – तृप्ती चांदवडकर (पुणे) – 8.75, सलोनी जाधव (पुणे) – 8.70, श्रेया महाजन (जळगाव) – 7.25, श्रुष्टी अम्बुरे (परभणी) – 7.10. ज्युनियर मुले – करण पवार (औरंगाबाद) – 6.00, आकाश मंडलिक (पुणे) – 5.95, दीप गोरले (अमरावती) – 5.90, विकास चव्हाण (औरंगाबाद) – 5.85. ज्युनियर मुली – समृद्धी साबळे (मुंबई शहर) – 7.80. ज्युनियर मुले (ब गट) – विशाल पासलकर (पुणे) – 8.25, स्वराज कोकाटे (पुणे) – 8.10.
ज्युनियर मुली (ब गट) – सलोनी जाधव (पुणे) – 8.20, अनुराधा अगरवाल (अमरावती) – 6.85, अपूर्वा धाकुलकर (अमरावती) – 6.70, चाकशुदा मिश्रा (अमरावती) – 6.50. सब-ज्युनियर मुली (ब गट) – सलोनी लोनारे (अमरावती) – 6.50. प्रकार – नानदाओ – वरिष्ठ पुरुष – स्वराज कोकाटे (पुणे) – 7.80 गुण, अक्षय पवार (कोल्हापूर) – 6.50.
वरिष्ठ महिला – तृप्ती चांदवडकर (पुणे) – 8.15, सलोनी जाधव (पुणे) – 8.05, श्रेया महाजन (जळगाव) – 7.50. ज्युनियर मुली – समृद्धी साबळे (मुंबई शहर) – 7.85. ज्युनियर मुले (ब गट) – विशाल पासलकर (पुणे) – 8.00, स्वराज कोकाटे (पुणे) – 7.95. ज्युनियर मुली (ब गट) – सलोनी जाधव (पुणे) – 8.10.