पुणे – महाराष्ट्र ज्युदो संघटनेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतदारांनी अॅड. धनंजय भोसले यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत बहुमताने अध्यक्षपद बहाल केले तर शैलेश टिळक यांची महासचिवपदी बिनविरोध निवड झाली.मागील कार्यकारिणीमधील महासचिव असलेल्या औरंगाबादच्या दत्ता आफळे यांची तांत्रिक समितीच्या सचिवपदी तर अध्यक्ष म्हणून मुंबईच्या रवी पाटील यांची नियुक्ती झाली.
उपाध्यक्षपदाच्या चार जागांसाठी एकूण पाच उमेदवार रिंगणात होते त्यातील राजकुमार पुनकर (अमरावती), पुरषोत्तम चौधरी (नागपुर) कावस बिलिमोरिया आणि यतीश बंगेरा (मुंबई) यांना बहुमत मिळाले.
महाराष्ट्र ज्युदो संघटनेची सातारा येथे रविवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश दिलीप कृष्णा गायकवाड तर भारतीय ज्युदो महासंघातर्फे कोषाध्यक्ष कैलास यादव, व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने संघटनेचे सहसचिव दयानंद कुमार यांनी निरीक्षक म्हणून काम पहिले.
महाराष्ट्र ज्युदो संघटनेची नूतन कार्यकारिणी
अध्यक्ष- अॅड. धनंजय भोसले (सातारा), उपाध्यक्ष- राजकुमार पुनकर (अमरावती), पुरषोत्तम चौधरी (नागपुर) कावस बिलिमोरिया आणि यतीश बंगेरा (मुंबई), महासचिव- शैलेश टिळक (रत्नागिरी), तांत्रिक समिति अध्यक्ष –रविंद्र पाटील (मुंबई) सचिव दत्ता आफळे (औरंगाबाद), कोषाध्यक्ष-रविंद्र मेटकर (नाशिक), सहसचिव – डॉ गणेश शेटकर, बीड, सभासद- डॉ सतीश पहाडे (अमरावती), अतुल बामनोदकर (औरंगाबाद), विकास पाटील (सातारा), विश्वास जोशी (औरंगाबाद), चंद्रशेखर साखरे (सांगली), प्रविण गडदे (उस्मानाबाद), निलेश गोयथळे (रत्नागिरी), जयंत साखरे (यवतमाळ), प्रविण कुपटीकर (नांदेड), दिनेश बागुल (धुळे), निखिल सुवर्णा (ठाणे), वीरधवल पाटोळे (कोल्हापूर) यांची तर विशेष निमंत्रित सदस्यपदी रत्नाकर पटवर्धन (नाशिक), अर्चना केवाळे (अमरावती), शोभना शेटकर (बीड) यांची राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली आहे.