मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मक -आमदार जगताप

सासवड (पुणे)- मराठा समाजाच्या मुलांसाठी शिक्षण, नोकरी आणि पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे आणि राजर्षी शाहू महाराज सारथी योजना सक्षमपणे चालवणे व त्यासाठी निधी उपलब्ध करण्याबात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सकारात्मक आहे, असे पुरंदर – हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगितीबाबत उठवून आरक्षण लागू करावे, यासाठी पुरंदर तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी रविवार (दि. 13) पासून सासवड येथील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोरील शिवतीर्थावर पुन्हा ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. बुधवारी (दि. 16) आमदार संजय जगताप यांनी शिवतीर्थावर येऊन निवेदन स्वीकारले.

जगताप म्हणाले, पुरंदर ऐतिहासिक भूमी असून हिंदवी स्वराज्याची सुरुवात याच ठिकाणाहून झाली आहे. इंग्रजांविरुद्ध पहिले बंड आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या माध्यमातून येथूनच सुरू झाले. यापूर्वीही मराठा आरक्षणासाठी याच भूमीतील गावांच्या मराठा समाजसह इतर समाज बांधवांनी सासवडच्या शिवतीर्थावर सलग 100 दिवस आंदोलन केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.