राज्य बास्केटबॉल स्पर्धा उद्यापासून पुण्यात

पुणे: आगामी राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धेकरिता महाराष्ट्राचे संघ निवडण्यासाठी मिनी गटाच्या (13 वर्षांखालील) राज्य अजिंक्‍यपद व आंतरजिल्हा निवड चाचणी बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन 28 जुलै ते एक ऑगस्ट या कालावधीत पुण्यात करण्यात आले आहे. शिवछत्रपती क्रीडासंकुल, बालेवाडी येथे रंगणाऱ्या या स्पर्देतील कामगिरीच्या आधारावर महाराष्ट्राच्या 13 वर्षांखालील मुले व मुलींचे संघ निवडण्यात येतील.

या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून मुलांचे 30 आणि मुलींचे 27 संघ सहभागी होत असून सुमारे 684 खेळाडू आणि 100हून अधिक पंच व तांत्रिक अधिकाऱ्यांचा सहभागही निश्‍चित झाला आहे. या स्पर्धेसाठी बालेवाडी येथे 3 बास्केटबॉल कोर्ट सज्ज करण्यात आली असून स्पर्धेतील सामने साखळी व बाद प्रकारे खेळविले जाणार असल्याचे पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष ललित नहाटा यांनी कळविले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या वर्षीची मिनी गटाची राज्य अजिंक्‍यपद बास्केटबॉल स्पर्धाही पुण्यातच पार पडली होती. या स्पर्धेतील मुलांच्या गटात नैर्ऋत्य मुंबई संघाने मुलांच्या गटांत, तर नागपूर संघाने मुलींच्या गटांत विजेतेपद पटकावले होते. मुलांच्या गटांत उत्तर मुंबई, आग्नेय मुंबई व सातारा यांनी पहिल्या चार क्रमांकांची निश्‍चिती केली होती. तर मुलींच्या गटांत पुणे, उत्तर मुंबई व सातारा यांनी पहिले चार क्रमांक निश्‍चित केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)