स्टेट बॅंकेची ऑनलाईन सेवा दोन तास बंद राहणार

मुंबई – भारतातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेची ऑनलाईन बॅंकिंग सेवा गुरुवारच्या साडेबारा वाजल्यापासून (00.30) अडीच वाजेपर्यंत (02.30) वाजेपर्यंत बंद राहतील असे ट्‌विट स्टेट बॅंकेने केले आहे.

या काळात डिजिटल यंत्रणेची देखभाल करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांनी बॅंकेला सहकार्य करावे असे स्टेट बॅंकेने जारी केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बॅंकेच्या मोबाइल बॅंकिंगवरती काही काळ परिणाम झाला होता. त्यानंतर ही सेवा सुरळीत झाली आहे.

ऑनलाइन बॅंकिंग सुविधा अविरत चालू राहाव्यात यासाठी बॅंकांनी आवश्‍यक ते प्रयत्न करावे असे रिझर्व बॅंकेने सांगितले आहे. त्यामुळे आगामी काळातही भारतातील बॅंका ऑनलाइन सेवा निरंतर चालू राहतील यासाठी काळजी घेण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.