कर्ज फेररचनेसाठी स्टेट बॅंकेची ई-फॅसिलिटी

रिटेल कर्ज घेतलेल्यांना होणार मदत 

मुंबई – रिटेल कर्ज घेतलेल्या ग्राहकांना ते कर्ज फेररचनेसाठी पात्र आहेत की नाहीत हे तपासण्यासाठी स्टेट बॅंकेने ई-फॅसिलिटी सुरू केली आहे. संबंधित ग्राहक बॅंकेच्या वेबसाइटवर जाऊन याबाबतची माहिती घेऊ शकतील.

रिझर्व्ह बॅंकेने करोनाचा परिणाम झालेल्या कंपन्या आणि वैयक्‍तिक कर्ज घेतलेल्या ग्राहकांना एक वेळ कर्जाची फेररचना करण्याची मुभा दिली आहे. ग्राहकांना ते संबंधित कर्जाच्या फेररचनेसाठी पात्र आहेत की नाहीत याची माहिती घरबसल्या मिळावी म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे, असे बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सी. एस. शेट्टी यांनी सांगितले. मात्र वेबसाइटवर ग्राहकाला फक्‍त ते कर्ज फेररचनेसाठी पात्र आहेत की नाही एवढेच समजेल. पुढे औपचारिक पेपर वर्कसाठी संबंधित ग्राहकाला बॅंकेच्या शाखेत यावे लागेल.

आतापर्यंत 3,500 रिटेल ग्राहकांनी या पोर्टलला भेट दिली असून त्यापैकी 111 ग्राहक त्यांच्या कर्ज फेररचनेसाठी पात्र असल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. 1 मार्च 2020 पर्यंत 30 दिवसांपेक्षा जास्त काळ कर्जाचा हप्ता न चुकलेले ग्राहक या योजनेसाठी पात्र आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.