मुंबई – सशस्त्र दलातील माजी जवान व सैनिकांच्या विधवा यांच्या मुलींच्या कल्याणासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाने दहा कोटी रुपये देण्याचे ठरविले आहे. दरवर्षी सात डिसेंबर रोजी सशस्त्र दल दिन साजरा करण्यात येतो.
यावेळी या मुलीच्या शिक्षणाची तरतूद करण्याच्या उद्देशाने बॅंक केंद्रीय सैनिक मंडळाशी सामंजस्य करार करणार आहेत. आपल्या कुटुंबावर अवलंबून असलेल्या 8 हजार 333 मुलींना एक वर्षासाठी दरमहा एक हजार रुपये पुरविण्यासाठी दहा कोटीचे वाटप करण्यात येणार आहे.
स्टेट बॅंकेचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की, आमच्या या प्रयत्नांमधून माजी सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात बदल घडवून आणण्यास मदत होईल अशी आम्हाला आशा आहे. त्यामुळे या मुलींना समान संधी उपलब्ध होण्यास मदत होईल.