आता बॅंकेत जाण्याची गरज नाही; ‘या’ क्रमांकावर काॅल करून घरबसल्या मिळवा SBIच्या अनेक सुविधा

नवी दिल्ली – एसबीआयच्या ग्राहकांना आता घरबसल्या अनेक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. एसबीआयने डोअरस्टेप बॅंकिंग सुविधा सुरू केली असून याद्वारे ग्राहकांना घरबसल्या चेक, डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर पिकअप, अकाउंट स्टेटमेंट रिक्वेस्ट, टर्म डिपाॅझिट इत्यादी सुविधांचा लाभ मिळणार आहे. एसबीआयने वेबसाइट आणि ट्विटद्वारे आपल्या ग्राहकांना ही माहिती दिली आहे.

बॅंकेच्या मोबाईल अॅप्लिकेशन, वेबसाईट किंवा काॅल सेंटरच्या माध्यमातून तुम्ही या डोअरस्टेप बॅंकिंग सुविधेचा लाभ घेऊ शकता. याशिवाय बॅंकेच्या कामकाज कालावधीत टोल फ्री नंबर 1800111103 क्रमांकावर सकाळी 9 वाजल्यापासून ते सायंकाळी 4 वाजेपर्यंतच्या वेळेत काॅल करू शकता.

एसबीआय च्या डोअरस्टेप बॅंकिंग सुविधेसंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही बॅंकेच्या https://bank.sbi/dsb वेबसाईटचा उपयोग करू शकता. तसेच तुमच्या होम ब्रॅंचमध्ये देखील संपर्क करू शकता. या सुविधेद्वारे तुम्ही कमित कमी 1 हजार रुपये आणि जास्तीत जास्त 20 हजार रुपयांपर्यंतची रक्कमही मागवू शकता.

काय आहे डोअरस्टेप बॅंकिंग सुविधा ?

डोअरस्टेप बॅंकिंग सुविधेद्वारे ग्राहक चेक जमा करणे, पैसे काढणे आणि जमा करणे, जीवन प्रमाणपत्र घेणे यांसारख्या अनेक सुविधांचा घरबसल्या लाभ घेऊ शकता. या सुविधेद्वारे 70 वर्षांहून अधिक वयाचे वयोवृद्ध व्यक्ती, दिव्यांग, दृष्टीहीन व्यक्तींना घरबसल्या या सुविधेचा लाभ मिळेल. डोअरस्टेप सुविधेत बॅंकेचा कर्मचारी तुमच्या घरी येईल आणि कागदपत्र, पैसे देणे-घेण्याचे काम करेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.