स्टेट बॅंकेची डेबिट कार्ड ईएमआय सुविधा

पुणे – उत्सव काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बॅंका प्रयत्न करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाने ग्राहकांना खरेदी करताना अडचण येऊ नये, यासाठी डेबिट कार्डवर ईएमआय सुविधा सुरू केली आहे.

ही सुविधा बॅंकेच्या ग्राहकांना उपलब्ध झाल्याचे बॅंकेने म्हटले आहे. एसबीआय डेबिट कार्डचा वापर करून बिल पेमेंट केल्यानंतर या कार्डधारकाला या वस्तूंच्या खरेदी वेळी 6 ते 18 महिन्यांत हप्त्यात पैसे देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

दीड हजार पेक्षा जास्त शहरातील 40 हजारांपेक्षा जास्त दुकानांमध्ये ग्राहक या सुविधेचा वापर करू शकणार आहेत. पाईन लॅबरोटरीच्या पीओएस मशीनवर व्यवहार करताना या सुविधेचा वापर करता येऊ शकेल. देशभरात अशा साडेचार लाख मशीन उपलब्ध आहेत.

ही सुविधा सुरू करताना स्टेट बॅंकेचे अध्यक्ष रजनिश कुमार यांनी सांगितले की, एखाद्या मोठ्या वस्तूसाठी खरेदी करतांना डेबिट कार्डद्वारे पेमेंट करताना ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी कसलीही कागदोपत्री कार्यवाही न करता हे कर्ज उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना प्रक्रिया शुल्क द्यावे लागणार नाही. त्यांना शाखेला भेट द्यावी लागणार नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.