राज्य बॅडमिंटन स्पर्धेत रियाला अजिंक्‍यपद

पुणे – उद्योन्मुख खेळाडू रिया हब्बू हिने नागपूर येथे झालेल्या राज्य बॅडमिंटन स्पर्धेतील 19 वर्षांखालील गटात विजेतेपद पटकाविले. तिने अंतिम सामन्यात तारा शहा या पुण्याच्या खेळाडूला पराभूत केले. हा सामना तिने 21-10, 21-18 असा जिंकला.

हब्बूने उपांत्य फेरीत रिया कुंजीर हिचा 21-17, 21-18 असा पराभव केला. त्याआधी तिने सिद्धी जाधव हिची विजयी घोडदौड 21-13, 21-14 अशी संपुष्टात आणली. हब्बूने या स्पर्धेतील सर्वच सामन्यांमध्ये ड्रॉपशॉट्‌सचा सुरेख खेळ केला. तसेच तिने कॉर्नरजवळ प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला. हब्बू व तारा या दोन्ही खेळाडू येथील निखिल कानेटकर अकादमीत सराव केला.

याच अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या वरुण कपूर याला रशियातील कनिष्ठ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद मिळाले. त्याला अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या मैराबे लुवांग याच्याकडून 5-21, 9-21 असा पराभव पत्करावा लागला. त्याआधी झालेल्या उपांत्य सामन्यात वरुणने थायलंडच्या वोराफोप याचा 21-15, 21-17 असा पराभव केला. त्याने स्मॅशिंगच्या फटक्‍यांचा सुरेख खेळ केला. उपांत्यपूर्व फेरीत वरूणने रशियाच्या आर्तूर पेचेन्किन याला 21-13, 21-17 असे सरळ दोन गेम्समध्ये हरविले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.