बिजींग – चीनमधल्या ज्या प्रांतातून करोनाची जगभर लागण झाली त्या हुबेई प्रांतातील करोना नियंत्रणात आल्याने तेथील लॉकडाऊन आता मागे घेतले जात असून तेथील विमान सेवाही उद्यापासून सुरू करण्यात येत आहे. त्या प्रांतातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ रविवारपासून खुले होत आहेत. मात्र वुहान शहरातील विमान सेवा मात्र सुरू करण्याबाबत अजून निर्णय घेण्यात आलेला नाही. तथापि त्या ठिकाणची बस आणि रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे.
वुहान शहरातील विमान सेवा आठ एप्रिल पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती तेथील सरकारी सूत्रांनी दिली आहे. हुबेई प्रांतातून हॉंगकॉंग, मकाओ आणि तैवानसाठीही विमाने सुरू होणार आहे. जगातील अन्य देशांसाठीच्या विमान सेवेलामात्र अजून अनुमती मिळायची आहे.