चक्राकार पद्धतीने न्यायालयांचे कामकाज सुरू करा

धर्मादाय आयुक्तालय येथील वकील संघटनेची मागणी

पुणे – न्यायालयीन कामकाजाचे वेळापत्रक रुळावर आणण्यासाठी जिल्हा न्यायाधीश नीरज धोटे यांनी सर्व वकील संघटनांकडून अभिप्राय मागविले आहेत. त्यास प्रतिसाद देताना पुणे पब्लिक ट्रस्ट प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशन या धर्मादाय कार्यालयातील वकिलांच्या संघटनेने “सर्व दिवशी, सर्व न्यायालये सुरू करण्यापेक्षा चक्राकार पद्धतीने न्यायालये सुरू करावीत. दोन न्यायकक्षांमधील एक न्यायकक्ष बंद राहील असे नियोजन असावे,’ असे सुचवले आहे.

“पक्षकारांना न्यायालय आवारात प्रवेश करतानाच आगमन वेळेची चिठ्ठी द्यावी व त्यांचे न्यायकक्षातले काम संपले, की संबंधित न्यायालयातील लिपिकाने वेळ मांडून द्यावी. त्यानंतर वेळेच्या 15 मिनिटात पक्षकारांनी न्यायालय आवारातून बाहेर पडण्याच्या सक्त सुचना द्याव्यात अशा स्वरूपाची कार्यपद्धती अवलंबावी असे सुचित केले आहे. त्याचप्रमाणे न्यायालय आवार, न्यायकक्ष दर दोन तासांनी निर्जंतुक करण्याची यंत्रणा राबवून सर्वांना मास्क अनिवार्य करावा,’ असे पत्र असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. मुकेश परदेशी यांनी दिले आहे. त्यावेळी विश्वस्त अॅड. शिवराज कदम उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.