कराड आगारातील ड्रेनेजचे पाइप बदलण्यास सुरुवात

कराड – कराड बसस्थानकातील स्वच्छतागृहाच्या ड्रेनेजची टाकी ओव्हरफ्लो झाल्याने बसस्थानक परिसर, नवग्रह मंदिर परिसरामध्ये दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. प्रवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने नगरपालिकेने याबाबत आगार प्रमुखांस नोटीस दिली. त्यावर आगाराकडून सोमवारी तातडीने तुंबलेली ड्रेनेज पाइप बदलण्याचे काम सुरू करण्यात आले. गेल्या आठवड्यात बसस्थानकातील ड्रेनेज ओव्हरफ्लो झाल्याने दुर्गंधीयुक्‍त पाणी वाहत होते. नवग्रह मंदिरासारख्या पवित्र ठिकाणालाही अवकळा आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्‍त होत होता. नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही याची पाहणी करून तात्काळ व्यवस्थापकास नोटीस काढली.

बसस्थानकातील स्वच्छतागृहाचे ड्रेनेज वारंवार ओव्हरफ्लो होऊन वाहत असते. अनेकवेळा बसस्थानक परिसरात तळे साचते. नागरिकांना कशीबशी वाट काढत जावे लागते. पालिकेने दिलेल्या नोटीशीनंतर आगार व्यवस्थापकांनी तातडीने स्वच्छतागृह बंद केले. त्यामुळे पाणी बाहेर पडणे थांबले मात्र ड्रेनेज पाइप बदलणे गरजेचे असल्याने सोमवारी या कामास सुरुवात करण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.